डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण उत्साहात संपन्न

आजकाल आपण जास्त वेळ स्मार्टफोनमध्ये असतो याचाच फायदा प्रामुख्याने आपल्या व्यावसायासाठी वास्तविकतेचा डिजिटल विपणन मध्ये कसा करुन घ्यावा ही संपूर्ण माहिती इंटरनेटवर व्यवसाय संबधित उत्पादने आणि सेवांची जोरात जाहिराती केल्या जातात , प्रमोशन केले जाते अशाप्रकारे, डिजिटल मार्केटिंग मध्ये व्यवसाय, उद्योग , कंपन्या हे सुनिश्चित करतात की त्यांचे मार्केटिंग प्रयत्न ग्राहकांपर्यंत सहज , सुलभरित्या पोहोचतील आणि त्यांची उत्पादनं व सेवा ग्राहकांना आवडतील , लोकप्रिय होतील व डिजिटल मार्केटिंग मुख्य उद्देश म्हणजे सेल्स वाढवणे हा प्रत्येक उत्पादकांना पूर्ण करता येईल.यासाठी आज दिनांक १९नोहे.रोजी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली कृषी विज्ञान केंद्र, किल्ला रोहा आणि विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट,रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोहा येथील जेष्ठ नागरिक सभागृमध्ये मार्केट मिर्ची डाॅटकाॅम द्वारा डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण घेण्यात आले.

या प्रशिक्षणच्या प्रमुख मार्गदर्शक श्रीमती प्रगती गोखले यांनी नागपूर येथून खास उपस्तित राहावून शेतकऱ्यांना online marketing consultant समजून सांगितले.ही माहिती आधी smart phone द्वारे प्रात्यक्षिके करुन घेतली नंतर प्रोजेक्टर दाखविली या मुळे कृतीतून जास्त अॅपची प्रक्रिया समजली जाते असे उपस्तित विद्यार्थी,महीला बचत गट,व संस्था संघटणेच्या प्रतिनिधींसमोर बोलतांना सांगितले.या प्रशिक्षणासाठी शहरी ग्रामीण मिळून शेकडोंच्या संख्येने भांग घेतला होता.

रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत विविध उपक्रम घेतले जातात त्यातून विद्यापीठतून तंत्रज्ञान विकसित मार्गदर्शन केले जाते.या रोह्यात रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान व बळीराजा शेतकरी सामाजिक संस्था अशा कार्यरत असून शेतकऱ्यांच्या मार्गदर्शन साठी व्हाट्सअप ग्रृपद्वारे उत्तम कार्य चालू असून या ऑनलाईन प्रशिक्षणाचा त्यांना नक्कीच उत्पादन केलेल्या मालासाठी उपयुक्त ठरेल असे डॉ.मनोज तलाठी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करुन इतक्या दूरवरून येऊन वेळेत हजर राहिल्या या बाबत श्रीमती प्रगती गोखलेंचे व या कार्यक्रमात उपस्तित सर्वांना धन्यवाद दिले.तर विवेकानंद रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था गेली अनेक वर्षे विविध मार्गांनी काम करत असून अनेकांना या संस्थेने रोजगार निर्मिती करीता सहकार्य केले आहे.आणि आजही हे कार्य अविरत चालू असून त्याचा फायदा जास्तीत जास्त तरुण तरुणींनी स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी घ्यावा असे वक्तव्य सुशील रुळेकर यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये केले.तसेच मार्गदर्शक व उपस्तित सर्वांना धन्यवाद दिले

तर उपस्तित काही तरुणांनी online marketing मुळे झालेली आर्थिक फसवणूक याचे आलेले अनुभव आणि झालेली नुकसान हे या कार्यक्रमात शाशंकावर चर्चा करण्यात आली याबाबत सुंदर मार्गदर्शन येत असलेले संभाव्य धोके कसे असतात याची गोखले मॅडम यांनी जाणीव करून विद्यार्थांच्या शंख्येचे निरसन करून दिले.

यावेळी रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भगत, बळीराजा शेतकरी सामाजिक संस्थेचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष रघुनाथ कडू,तसेच या संस्थेचे खजिनदार दगडू बामुगडे,कोकण शेतकरी व मजूर सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष सौ.प्रियांका कांबळे,KVK शास्त्रीय सल्लागार समिती सदस्य सौ.रुपाली सचिन देवकर, तसेच महिला बचतगट, तरुण उद्योजक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन kvk किल्ला,प्राध्यापक डॉ. मांजरेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन kvk किल्ला प्राध्यापक सुधाकर पाध्ये यांनी मानले हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या सर्व सहकार्यांनी अतिशय मेहनत घेतली.

https://www.raigadswabhiman.com/2022/11/blog-post_57.html

Images